#नाताळ

Showing of 1 - 14 from 39 results
VIDEO : सांगलीत धूम स्टाईल रिक्षांचा थरार; क्षणाक्षणाला होता-होता टळले अपघात

व्हिडिओFeb 7, 2019

VIDEO : सांगलीत धूम स्टाईल रिक्षांचा थरार; क्षणाक्षणाला होता-होता टळले अपघात

सांगली, 7 फेब्रुवारी : रिव्हर्स रिक्षांच्या शर्यतींचा थरार सांगलीतील हरिपूर या ठिकाणी सांगलीकराना अनुभवयास मिळाला. या रिव्हर्स स्पर्धेमध्ये गल्ली बोळातून धूम स्टाईलने धावणाऱ्या रिक्षा पाहून अंगावर काटा उभा रहात होता. कमीत कमी वेळात अवघड वळणं आणि ते ही गल्ली बोळातून रिव्हर्स रिक्षा पळवून ही स्पर्धा जिंकण्याचं आव्हान होतं. सुमारे ८०च्या स्पीडनं या रिक्षा उलट्या दिशाने धावत होत्या. धक्कादायक म्हणजे अनेकदा तर अवघ्या काही क्षणासाठी अपघात होता होता टळला. सांगली नजीकच्या हरिपूर गावात आज संगमेश्वर नाताळ यात्रे निमित्त रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचे आयोजन केलं होतं. यासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे 12 रिक्षा स्पर्धकांनी या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभाग घेतला होता. या वेळी सांगलीच्या शशिकांत पाटील या रिक्षा चालकाने या थरारक स्पर्धे मध्ये सहा किलो मीटरचे अंतर केवळ 3 मिनिट 47 सेकंदात पार करत विजेतेपद पटकावलं.

Live TV

News18 Lokmat
close