#नागपूर

Showing of 1262 - 1275 from 1279 results
भुजबळांचा आणखी एक 'माणूस'अडचणीत

महाराष्ट्रMay 29, 2013

भुजबळांचा आणखी एक 'माणूस'अडचणीत

प्रवीण मुधोळकर, नागपूर नागपूर 28 मे : सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबतच त्यांच्या अनेक निकटवर्तीयांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत. चिखलीकर आणि बेडसेंचं प्रकरण गाजत असतानाच आता विदर्भात भुजबळांशी संबंध असेलेले किशोर कन्हेरे अडचणीत आले आहेत. कन्हेरे यांच्या कंपन्यांनाच नियमबाह्य पद्धतीने कामं देण्यात येत असल्याचा आरोप नागपूरच्या कंत्राटदार असोसिएशननं केलाय. घोटाळ्यातील दोषी अधिकार्‍यांना किशोर कन्हेरे यांच्या सोयीसाठीच पुन्हा कामावर घेण्यात आल्याचाही आरोप असोसिएशननं केलाय.आधी संदीप बेडसे, मग शैलेष चांगले.. आणि आता किशोर कान्हेरे. छगन भुजबळांच्या जवळच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होतायत. नागपूरमधले भुजबळांचे निकटवर्तीय कंत्राटदार किशोर कन्हेरे यांनाच सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं नियमबाह्य पद्धतीने दिली गेल्याचा आरोप एका याचिकेद्वारे नागपूर हायकोर्टात करण्यात आला होता. त्यावर चौकशीचे आदेश कोर्टाने दिले. फर्निचर घोटाळ्यात अडकलेल्या अधीक्षकाला विभागाने चंद्रपुरात रूजू करून घेतलं, ते कन्हेरे यांची कामं मार्गी लागावीत म्हणून असा आरोप कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं केलाय. नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान रामगिरी, विधानभवन आणि हैदराबाद हाऊसमध्येही फर्निचरची खोटी बीलं लावून तीन कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. कन्हेरेंच्या अंकित कन्स्ट्रक्शननं नागपूरच्या आऊटर रिंग रोडच्या बांधकामाचा काही भाग बेकायदेशीर पद्धतीने केल्याची तक्रार कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं केलीय. शिवाय याच कंपनीने केलेल्या इनर रिंग रोडचं काम निकृष्ट असूनही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवालही उपस्थित झाला. पण आयबीएन लोकमतशी बोलताना कन्हेरेंनी सर्व आरोप फेटाळले. मी भुजबळांचा कार्यकर्ता आहे, पण हे आरोप मात्र खोटे आहेत असा त्यांनी दावा केला. कन्हेरे भुजबळांच्या अत्यंत जवळचे आहेत, हे सर्वांना सर्वांना ठाऊक आहे आणि त्यामुळेच वारंवार तक्रारी करूनही आणि पुरावे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप होतोय.

Live TV

News18 Lokmat
close