News18 Lokmat

#नागपूर

Showing of 2120 - 2133 from 2481 results
चिमटा धरणात 10 कोटींचा घोटाळा ?

बातम्याMay 26, 2012

चिमटा धरणात 10 कोटींचा घोटाळा ?

26 मेमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर निम्न पैनगंगा प्रकल्पाचं चिमटा धरण होतंय. 1997 पासून या धरणाचे काम आज घडीलाही जैसे थेच आहे. सुरुवातीला 1400 कोटी रुपयाचे हे धरण आजघडीला 14 हजार कोटी झालंय. दरवर्षी या धरणाची किंमत वाढु लागली आहे. नेहमी ऐकलं जातं की,काम पुर्ण झाल्यानंतर एखाद्या धरणाचा भ्रष्टाचार उघडकीय आला. इथे मात्र सुरुवातीला 10 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. कुठलीही परवानगी नसताना या धरणाबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल असताना काम मात्र राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला राष्ट्रीय जल आयोगाची परवानगी नाही. तसेच डब्ल्यु.सी.एल.चीही परवानगी नाही. या धरणात 44 गावे आदिवासी क्षेत्रातील असल्यांने या बाबत कोणताही विचार केलेला नाही. यापुर्वी प्रकल्पाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागील वर्षी 19 सप्टेंबर 2011 रोजी स्थगनादेश दिला आहे. मात्र अजूनही काम सुरुच आहे. या धरणाला 95 गावंाचा विरोध आहे. निम्न वैनगंगा विरोधी संघर्ष समितीने अनेक वेळा आंदोलने केली मात्र या उलट समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या विरोधात 25 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या धरणाची गरज इथल्या जनतेलाच नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मंत्रीच धरणाच्या बाजुने उभे असल्याचा आरोप येथील जनता करत आहे.