नागपुरात

Showing of 755 - 768 from 920 results
विदर्भ तापला, नागपूरचा पारा 47 वर

बातम्याMay 21, 2013

विदर्भ तापला, नागपूरचा पारा 47 वर

नागपूर 21 मे : विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या तीन दिवसापासून विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांचं तापमान 45 अंशावर आहे. चंद्रपूर आणि नागपुरात उन्हानं कहर केला असून दोन्ही शहरांचं तापमान 47 अंशाच्या वर पोहचलाय, गेल्या पंधरा दिवसात चंद्रपूर आणि गडचिरोलीत उष्माघाताने दहा जणांचा बळी गेला. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. येत्या 24 तासात ही परिस्थिती कायम राहणार असल्याबद्दल हवामान खात्याने चिंता व्यक्त केली. गेल्या चोवीस तासात चंद्रपूर 47.9, नागपुरात 47.3, ब्रम्हपूरी 46.7, वर्धा 46 , अकोला जिल्हयात 45.1 डिग्री सेल्सिअस तपमानाची नोंद झालीय. तर दुसरीकडे, सर्वसाधारण वेळेच्या आधी अंदमान बेटावर पोहोचलेल्या मान्सुनला ब्रेक लागला. महासेन चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही बंगालच्या उपसागरावर असल्याने मान्सुनचा वेग मंदावला. पुढच्या काही दिवसात मान्सुनच्या वाटचालीसाठी अनुकुल वातावरण नाही असं हवामान विभागाने सांगितलं. दरवर्षी 1 जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून महासेन वादळामुळे दोन दिवस उशीरा म्हणजेच 3 जूनला दाखल होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading