News18 Lokmat

#नागपुरात

Showing of 586 - 599 from 719 results
एचआयव्हीग्रस्त शिपायाचा अधिकार्‍यांकडून छळ

बातम्याJun 8, 2012

एचआयव्हीग्रस्त शिपायाचा अधिकार्‍यांकडून छळ

08 जूनपुण्यातील एचआयव्हीग्रस्त एसटी ड्रायव्हरचं प्रकरण समोर असतानाच आता नागपूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूरच्या कारागृहात शिपाई म्हणून काम करणार्‍या विजय गवळीला त्यांच्या सहकार्‍यांनीच त्यांना मानसिक त्रास दिल्याचं उघड झालंय. विजय यांना उपचार घेण्यासाठी सुट्टी दिली नाही. त्यातच विजयची तडकाफडकी नागपुरात बदली केली. वारंवार उपचारासाठी जावं लागत असताना अधिकारीच अशाप्रकारे छळ करतात, असा आरोप विजय यांनी केला. विशेष म्हणजे जागतिक एड्स दिनीच त्यांच्या घरची वीज कापण्यात आली. वारंवार अधिकार्‍यांकडे तक्रार करुनही त्यांच्या समस्येकडं दुर्लक्ष केल्याचं विजयचं म्हणणं आहे.