#नागपुरात

Showing of 560 - 573 from 604 results
राज्यभरातून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा

बातम्याAug 15, 2011

राज्यभरातून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा

15 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ त्यांच्या गावी राळेगणसिध्दीमध्ये भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीसमोर झेंडावंदन केल्यानंतर, अण्णा हजारे जिंदाबादच्या नार्‍यासह संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि तरुण वर्ग या रॅलीत सहभागी झाले होते. आज संध्याकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असुन यात आंदोलनाबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. तर त्याचबरोबर मनिष तिवारी यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचं दहनही आज करण्यात आले. नागपुरात रॅलीभ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही सामाजिक संस्थांनी व्हेरायटी चौकातून रॅली काढली. महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून रॅली काढली. यात लहान मुलांनीही भाग घेत भ्रष्टाचार विरोधी लढ्याला पाठिंबा दिला. भ्रष्टाचाराविरूध्दच्या अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इंडिया अगेंस्ट करप्शन च्या कार्यकर्त्यांनी पुण्यात शनिवार वाड्याजवळ रॅली काढली. तर नाशिकमध्येही अण्णांना पाठिंबा देण्यासाठी रॅली काढण्यात आली.

Live TV

News18 Lokmat
close