#नागपुरात

Showing of 1 - 14 from 396 results
VIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल

व्हिडिओJan 15, 2019

VIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल

नागपूर, 15 जानेवारी : मेट्रो प्रोजेक्टसाठी महामेट्रोच्या मालकीचे कोचेस नागपुरात दाखल झालेत. एकूण 69 कोचेस चीनमधील चायना रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशननं तयार केले आहेत. त्यापैकी पहिल्या 3 कोचेसची एक रेक नागपुरात आज दाखल झाली. सध्या 'ट्रायल रन'च्या माध्यमातून धावणाऱ्या मेट्रोत नागपूरकर तिकिट काढून बसू शकतील. युद्धस्तरावर काम सुरू असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, दुसऱ्याही टप्प्याला सरकारने मान्यता दिली आहे. चायनावरुन आलेल्या हे कोचेस शहरातील 38 किलोमिटरच्या मेट्रो मार्गावर चालविले जाणार आहेत. यात हिंगणा ते पार्डी आणि कामठी रोड ते खापरी या मार्गाचा त्या ताशी 80 कि.मी. वेगाने धावतील. या कोसेसचे मेटेनन्स पुढील दहा दिवस ते तयार करणाऱ्या 'चायना रोलिंग स्टाँक कार्पोरेशन' हीच कंपनी करणार असल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close