#नांदेड

Showing of 27 - 40 from 405 results
VIDEO : धावत्या रेल्वेत चढण्याची घाई अंगाशी, पण....

बातम्याJul 28, 2018

VIDEO : धावत्या रेल्वेत चढण्याची घाई अंगाशी, पण....

नांदेड रेल्वे स्थानकावर धावती रेल्वे पकडण्याच्या नादात एका वृद्ध प्रवाश्याचा तोल गेला. तो खाली पडला पण त्याच वेळी जवळच्या रेल्वे सुरक्षाबलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओढून बाहेर काढले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. नांदेड शहरातील सप्तगीरी सकाळी कॉलनी येथील 65 वर्षीय देवराव लोणे हे नांदेड येथून परभणीला जाणार होते. सकाळी स्थानकावर आल्यानंतर तपोवन एक्स्प्रेस निघाली होती. त्यात चढण्याच्या प्रयत्नात लोणे यांचा तोल गेला आणि पडले. गाडीसोबत ते फरफटत होते. त्याच ठिकाणी थांबलेल्या रेल्वे सुरक्षाबलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन त्यांना अलीकडे ओढले. तोपर्यंत डब्यातील प्रवाश्यानी चैन ओढून गाडी थांबवली. रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या प्रसंगावधामुळे वृद्ध प्रवाश्याचे प्राण वाचले.

Live TV

News18 Lokmat
close