#नरेंद्र मोदी

Showing of 1 - 14 from 85 results
आईने दिलेल्या 'या' अमूल्य भेटीने गहिवरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

बातम्याSep 17, 2019

आईने दिलेल्या 'या' अमूल्य भेटीने गहिवरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

गांधीनगर 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस देशभर 'सेवा दिवस' म्हणून साजरा केला जातोय. यानिमित्त भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. तर मोदींनी गुजरातमध्ये आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि त्यांनी आपल्या आईंचा आर्शीवाद घेतला आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं. पंतप्रधान मोदी दरवर्षी न चुकता आपल्या वाढदिवसाला आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतात. आणि हिराबेन या आपल्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी काही नाणी आणि पैसे भेट म्हणून देतात. ही भेट आपल्यासाठी अमुल्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.