धुळे Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 84 results
अंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी

व्हिडीओSep 20, 2018

अंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी

धुळे, 20 सप्टेंबर: धुळे शहर बस स्थानकात भुषण कैलास शिंपी या तरूणाने एस टी बसखाली उडी घेत केली आत्महत्या केली. सकाळी बसस्थानकात हा थरारक प्रकार घडला. बस स्थानकातुन बाहेर निघणाऱ्या चालत्या बसखाली भुषणने स्वःताला झोकुन देत आत्महत्या केली. दृश्यांमध्ये आपण पाहु शकतो की तो आधी एका बस खाली उडी मारण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र ते शक्य न झाल्याने त्याने भुसावळ साक्री या बस खाली उडी घेतली. त्यात यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. मयत तरूण पारोळा येथील रहिवासी असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर बस स्थानकात एकच खळबळ उडाली होती. नेमका हा प्रकार सुरूवातीला लक्षातच आला नाही. मात्र सीसीटीव्हीची दृश्य पाहिल्यावर हा अपघात नसुन आत्महत्या असल्याचे स्पष्ट झालं.