#दोन

Showing of 1 - 14 from 11755 results
देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस

बातम्याJul 18, 2019

देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस

मुंबई, 18 जुलै: रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळं मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. मुंबईहून निघालेली मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस इगतपुरी कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात आली. तब्बल 500 फूट उंचीवर असलेल्या पुलावर एक्सप्रेस येताच तिचा इंजिनामागील डबा रुळावरून घसरला. इंजिनचालकाने प्रसंगावधान राखून कुशलतेने ब्रेक दाबला. जर मागील आणखी दोन डबे घसरले असते तर अख्खी एक्सप्रेस 500 फूट खोल दरीत कोसळून हाहाःकार झाला असता. मोठी जीवितहानी झाली असती. इंजिनचालकाचे प्रसंगवधान म्हणून सगळे प्रवासी बालंबाल बचावले.

Live TV

News18 Lokmat
close