Elec-widget

#दीपिका

Showing of 638 - 651 from 653 results
तिरंदाज दीपिका ऑलिम्पिक बाहेर

बातम्याAug 1, 2012

तिरंदाज दीपिका ऑलिम्पिक बाहेर

01 ऑगस्टभारताच्या मिशन ऑलिम्पिकला आज सर्वात मोठा धक्का बसला आहे. मेडलची सर्वाधिक अपेक्षा असलेल्या तिरंदाज दीपिका कुमारीला पराभवाला सामोरं जावं लागलंय. तिरंदाजीच्या वैयक्तिक प्रकारात दीपिकाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. वर्ल्ड नंबर वन असलेल्या दीपिका कुमारीची पहिल्या फेरीत गाठ होती ती इंग्लंडच्या ऑलिव्हर ऍमीशी. पण संपूर्ण मॅचमध्ये दीपिकाला सूरच सापडला नाही. ऑलिव्हरनं ही मॅच 6-2 अशी सहज जिंकली. दीपिका कुमारीच्या पराभवामुळे भारतीय तिरंदाजांचं लंडन ऑलिम्पिकमधलं आव्हान आता पूर्णपणे संपलंय.