दिवाकर रावते

Showing of 326 - 339 from 340 results
गिरणीकामगारांच्या मुलांना नोकरी देणार

बातम्याApr 23, 2010

गिरणीकामगारांच्या मुलांना नोकरी देणार

23 एप्रिलमुंबईतील गिरणी कामगारांचा प्रश्न पुन्हा विधान परिषदेत चर्चेला आला.नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सरकारतर्फे एकाही गिरणी कामगाराच्या मुलाला नोकरी देऊ न शकल्याची कबुली बुधवारी दिली होती.तरीही याबाबतच्या गुरुवारच्या छापील उत्तरात सरकारकडून पुन्हा एकदा कामगाराच्या कुटुंबातल्या किमान एकाला नोकरी देणार असे म्हटले आहे. या दोन्ही गोष्टींतील खरे काय? असे विचारत शिवसेना गटनेते दिवाकर रावते यांनी खुलाशाची मागणी केली. याबाबत जर मंत्री उत्तर देऊ शकले नाहीत तर आम्ही त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर सभापतींनी या प्रश्नांत हस्तक्षेप करत या विषयावर आपल्या दालनात चर्चा होईल, असे सांगितले

ताज्या बातम्या