#दादर

Showing of 79 - 92 from 372 results
VIDEO: तिकीट काढूनही जागा मिळाली नाही म्हणून प्रवाशांनी 3 तास रखडवली ट्रेन!

व्हिडिओSep 18, 2018

VIDEO: तिकीट काढूनही जागा मिळाली नाही म्हणून प्रवाशांनी 3 तास रखडवली ट्रेन!

दादर-रत्नागिरी पेसेंजर रत्नागिरी स्थानकावर प्रवाशांनी रोखली. तीन तासांपासून रेल्वे गाडी रखडली आहे. रत्नागिरीतील प्रवाशांना डब्यात जागा नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आणि त्यांनी थेट रेल्वे गाडी रोखून धरली. रेल पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रवाशांना आवरण्यासाठी रेल्वेस्थानकावर दाखल झाले आहेत. गौरी गणपतीचे विसर्जन करून चाकरमानी परतीच्या प्रवासावर आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. रेल्वे, बसेस फुल असल्यानं अनेकांना तिकीट मिळत नाही, काही जणांनी रेल्वेचे तिकीट काढूनसुद्धा जागाच मिळत नसल्यानं हा संताप व्यक्त केला जात आहे.

Live TV

News18 Lokmat
close