#दादर

Showing of 495 - 497 from 497 results
राज ठाकरे यांच्या अटकेच्या अफवेने मनसे कार्यकर्ते घाबरले

बातम्याOct 25, 2008

राज ठाकरे यांच्या अटकेच्या अफवेने मनसे कार्यकर्ते घाबरले

25 ऑक्टोबर, मुंबई - राज ठाकरे यांना जमशेदपूर पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल, अशी अफवा 24 ऑक्टोबरच्या रात्री पसरली. या अफवेनं 24 ऑक्टोबरच्या रात्री शेकडोंच्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनी 'कृष्णकुंज' या राज यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली होती. त्यामुळे दादर-शिवाजीपार्क परिसरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. जमशेदपूर कोर्टाने राज ठाकरे यांच्यावर हेअजामीनपात्र वॉरण्ट बजावलं आहे.राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा मुद्दा गाजतो आहे. फेब्रुवारी महिन्यात राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि छटपुजेचा मुद्दा यावरून प्रक्षोभक भाषणं केली होती. यावरून राज ठाकरे यांच्या विरोधात जमशेदपूर कोर्टात एका याचिका दाखल करण्यात आली होती. पण जमशेदपूर कोर्टात राज यांनी जाणं टाळलं होतं. त्यामुळे जमशेदपूर कोर्टाने राज यांच्यावर अजामीनपात्र वॉरण्ट बजावलं आहे. या अजामीनपात्र वॉरण्टमध्ये 17 नोव्हेंबरपर्यंत राज यांनी जमशेदपूर कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे. या याचिकेविरोधात राज ठाकरे यांच्याकडून रांची कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेत असं म्हटलं आहे की, 'जमशेदपूर कोर्टाने राज ठाकरे यांना ज्या गुन्ह्यांअतर्गत वॉरण्ट बजावलेलं आहे ते सर्व गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांवरचा खटला मुंबई किंवा महाराष्ट्रात व्हावा.' त्या याचिकेचा निकाल आज लागणार आहे. असं असताना राज ठाकरे यांना जमशेदपूर पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल हे कळताच मनसे कार्यकर्त्यांनी ‘कृष्णकुंज’ या राज यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली होती.