#दादर

Showing of 352 - 365 from 374 results
कोणत्याही नामांतराला विरोध !

बातम्याMay 30, 2011

कोणत्याही नामांतराला विरोध !

30 मेमहाराष्ट्राच्या कोणत्याही नामांतराला आपला विरोध आहे. महापुरूषांची नाव घेऊन राजकारण करायची आणि त्यातून लोकांची माथी भडकवतं ठेवायची एवढाच यामागे उद्योग आहे. कोणत्याही गल्ली बोळाला, चौकांना महापुरूषांची नाव देऊन काय साध्य होणार आहे. आणि यासाठी झगडतं राहावे ही बाब दुर्देवी आहे. जर दादर स्टेशनला प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव ही दिलं तरी त्याला आपण विरोध असणार आहे . राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन या वादाबद्दल मत स्पष्ट केलं. राज ठाकरे पुढे म्हणाले की, माझा विरोध हा कोणत्याही व्यक्तीला नाही विरोध आहे तो नामांतराला. जर उद्या प्रबोधन ठाकरे यांचं नाव ही दिलं त्याला ही आपला विरोध असणार आहे. गल्ली बोळाना महापुरूषांची नाव द्याची ज्यांच्यामुळे महाराष्ट्राला अभिमान मिळाल्या त्यांच्या नावने किरकोळ राजकारण करायचं हे कोणतं राजकारण म्हणावे. जर नाव बदल्याची असेल तर ब्रिटिशांनी दिलेली नाव बदला. जर राष्ट्रवादीला एवढी खुमखुमी असेल तर त्यांच्या नेत्यांनी लोकसभेत पाचशेच्या नोटेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणून दाखवावं केंद्रात पवार साहेबांचं वजन आहे ही मागणी लावून धरावी. ज्या दर्जाची ही लोक आहे त्यांचा तसाच मान राखला गेला पाहिजे ना ? कोणत्याही स्टेशन,गल्लीला नाव द्याचं ही कोणती पध्दत ? व्हिटी स्टेशनचं नाव बद्दलून सिएसटी झालं तर काय तिथं फरक पडला. मराठवाड्यात विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं तर काय तिकडली शिक्षण पध्दत बद्दलली का ? असा सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हे सर्व राष्ट्रवादी आणि आरपीयशी बिनसलंय यातून हे घडतं आहे. जर राजकारण करायचं असेल तर महापुरूषांचा मान राखला जाईल अशा संस्था उभ्या करा. पण हे सर्व ढोंगी राजकारणासाठी या महापुरूषांना वापरून घेतात या पलीकडे काही नाही. तसेच रिडल्स इन हिंदुझम या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा जेव्हा वाद सुरू होता, तेव्हा आता राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेनेत असताना हुतात्मा चौकात जाऊन गोमूत्र शिंपडलं होतं याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. अशा प्रकारच्या कोणत्याही नामांतराला आपला आणि आपल्या पक्षाचा विरोध असणार आहे.असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Live TV

News18 Lokmat
close