#दागिने

Showing of 14 - 27 from 43 results
CCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन

महाराष्ट्रNov 17, 2018

CCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन

भिवंडी, 17 नोव्हेंबर : अवघ्या 10 वर्षांच्या मुलीनं दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत घडला आहे. भिवंडीजवळच्या कांबेगावातल्या आशापुरा ज्वेलर्समध्ये ही 10 वर्षांची मुलगी बुधवारी संध्याकाळी 2 महिलांसोबत आली. त्यावेळी अनोखळी दोन्ही महिलांनी दुकानदाराला पैंजण दाखवायला सांगतिलं. दुकानदार पैंजण दाखवत असताना या मुलीनं दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या मंगळसूत्राच्या वाट्या चोरुन खिशात घातल्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी दुकान मालकानं निजामपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फुटेजच्या आधारे याप्रकरणी तपास सुरू केला आहे.