दहिसर

Showing of 105 - 118 from 130 results
मनसे सैनिकांनी टोलनाका फोडला

बातम्याJun 12, 2012

मनसे सैनिकांनी टोलनाका फोडला

12 जूनमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसात टोलविरोधी आंदोलन करणार असं जाहीर केलं. आणि मनसे कार्यकर्त्यांनी राज यांची घोषणा आदेश मानत दहिसर येथील टोल नाक्याची तोडफोड केली. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली 30 ते 40 कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला. टोलनाक्याच्या एका केबिनाचा कार्यकर्त्यांनी चुराडा केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची झटापट झाली. संतप्त कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दहिसर टोलनाक्यावर अवैधपणे टोल वसूल केली जात होती याबद्दल आम्ही वारंवार आंदोलन केले पण अवैध टोल सुरुच होती त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.दरम्यान, राज ठाकरे यांनी आज ठाण्यात झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यातील टोल नाके आणि टोलभैरवांच्या तावडीतून रस्ते मुक्त करा अशी मागणी केली. राज्यात टोल नाक्यावरुन प्रवाशांची लूट होतेय याकडे यांचे लक्षच नाही. आला की टोल नाका भरले पैसे पण हे किती दिवस सुरु राहणार आहे. पण किती टोलवसुली झाली ? किती गाड्या गेल्यात ? अजून किती दिवस टोल सुरु राहणार याकडे कुणाचे लक्ष नाही. बांधलेल्या रस्त्याची किंमत वसुल होऊन सुध्दा टोल नाके सर्रास सुरुच आहे याबद्दल दोनच दिवसात राज्यभरात मनसेच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात येणार आहे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. पिशव्यामुक्तीपेक्षा रस्ते टोलमुक्त करा - राज ठाकरे