#दलित

Showing of 768 - 776 from 776 results
मालेगावात युवती आणि आयुक्तांची खोटी बदनामी

बातम्याJan 12, 2009

मालेगावात युवती आणि आयुक्तांची खोटी बदनामी

12 जानेवारी, मालेगावदीप्ती राऊतसंवेदनशील समजलं जाणारं मालेगाव 27 डिसेंबरला प्रकाशात आलं ते वेगळ्यात बातमीनं. 26 डिसेंबरच्या रात्री तिथल्या एका नगरसेवकानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं महापालिका आयुक्तांना काळं फासलं. त्यांच्यासोबत परदेशी कुटुंबावरही शिंतोडे उडवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र यामागे मोठे कारस्थान असल्याचं आणि स्थानिक पोलिसही त्यात सहभागी असल्याचं पुढे येत आहे.26 डिसेंबरला परदेशींच्या घरासमोर लोक जमले. आयुक्तांना रंगेहात पकडण्याची आवई उठवण्यात आली. त्यांना कोंडण्यात आलं, त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. फोटो काढले गेले, शूटींग घेतलं गेलं. इतकंच नाही, तर त्याच्या सीडीजही मालेगावमध्ये वाटण्यात आल्या. तडकाफडकी आयुक्तांची बदली झाली आणि ज्योतीला तिच्या आईसह मालेगाव बाहेर काढण्यात आलं...यात पुढाकार घेणार्‍या नगरसेवकाचे यांच्यासोबत जुने वाद सुरू आहेत."सुरुवातीला दांडियावरून झालं. त्यानं सायकली फेकल्या. शिवीगाळ केली. घरावर दगडफेक केली. लोकांना खोटंनाटं सांगून राजवर्धन साहेबांकडे आमच्याविरुद्ध मोर्चा नेला. 2006 मध्ये निवडून आल्यावर आम्हाला कोंडलं. जाळण्याचा प्रयत्न केला. जागे होतो म्हणून आम्ही वाचलो."असं ज्योती परदेशीनं सांगितलं.प्रत्यक्षात यामागे वेगळंच कारस्थान होतं. एका दगडात दोन पक्षी मारण्यात आले. न ऐकणार्‍या परदेशी कुटुंबाची हकालपट्टी झाली आणि अडथळा आणणार्‍या आयुक्तांची उचलबांगडी झाली. आयुक्तांच्या येण्यानं मालेगाव महापालिकेच्या अनेक रुढींना आळा बसला होता."दलित वस्ती सुधार कार्यक्रमाअंतर्गत 40 लाखांचा भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. कामं न करता बिलं काढण्यार्‍या कंत्राटदार- नगरसेवक - कर्मचारी रॅकेटला आळा घातला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मालेगावमध्ये रुजलेली अल्टर अर्थात जकात चोरीची सिस्टीम बंद पाडली. यामुळे जेमतेम 74 हजारांवर पोहोचणारी जकात 20 दिवसात 5 लाख 24 हजारांवर गेली. वर्षानुवर्ष हे सर्व बिनदिक्कत चालवणार्‍या राजकीय पुढार्‍यांना यात लाख-दीड लाख रुपये दंड भरावा लागला. त्याचा वचपा त्यांनी असा काढला. याचा योग्य तपास करण्याऐवजी पोलिसांनी ज्योतीची तक्रार नाकारली. "रात्रभर मला तिथे ठेवलं. माझ्या आईला बाहेर काढलं आणि मला बेल्टनं मारलं. रात्रभर तिथे ठेवलं. मी शुद्धीवर नव्हते. काहीतरी लिहून घेतलं. काय ते सांगता येणार नाही. नाही दिलं तर वातावरण बिघडेल असं पोलीस म्हणाले." असं ज्योतीनं सांगितलं.