News18 Lokmat

#दंड

Showing of 612 - 625 from 747 results
सानंदा प्रकरणी विलासरावांवर कारवाई कधी ?

बातम्याJul 9, 2012

सानंदा प्रकरणी विलासरावांवर कारवाई कधी ?

सुधाकर काश्यप,मुंबई09 जुलैमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख,आमदार दिलीप सानंदा आदींवर गुन्हा दाखल करावा याबाबची तक्रार किल्ला कोर्ट येथे करण्यात आलीय. मात्र, चार महिन्यानंतर ही पोलीस त्याबाबत कारवाई करत नसल्याची तक्रार कोर्टाकडे करण्यात आलीय. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 जुलै रोजी होणार आहे.बुलढाणा येथील आमदार दिलीप सानंदा यांच्यावर कारवाई करु नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विसालराव देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांवर दबाव आणला होता. देशमुख यांच्या पीएने बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक आदीची बैठक बोलावून सांनदा यांच्यावर कारवाई करताना सबूरीने घेण्याचे आदेश दिले होते. याबाबत विलासराव देशमुख यांच्या सुप्रीम कोर्टाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच प्रकरणात विलासराव तसंच दिलीप सांनदा यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई व्हावी यासाठी अब्दुल चौधरी या सामाजिक कार्यकर्त्यांनी किल्ला कोर्टा येथे तक्रार करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.यावेळी पोलिसांनी आज पुन्हा एकदा तपासासाठी वेळ मागितला. तक्रारदारांचे वकिल आशिष गिरी म्हणतात, गेल्या तीन महिन्यांपासून याची सुनावणी सुरु आहे. गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी काही केलं नाही. ते मग आता पुढच्या पंधरा दिवसात ते काय करणार आहेत.सामाजिक कार्यकर्ते अब्दुल चौधरी यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 200 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं म्हटंल जातंय.अनेक शेतकर्‍यांनी सानंदा यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी आपली हि लढाई आहे, असं चौधरी यांचं म्हणणं आहे. विलासराव देशमुख , आमदार दिलीप सानंदा त्याचे वडिल गोकुळचंद सानंदा यांच्या विरोधात शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारदारांची मागणी आहे.सानंदा यांच्यावर कारवाई होई नये यासाठी विलासराव देशमुख यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात बेठक बोलावली होती.त्यामुळे या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारदारांची मागणी आहे.