#थिएटर

Showing of 118 - 126 from 126 results
नाटकांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

बातम्याJan 14, 2009

नाटकांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

14 जानेवारी मुंबईमुंबई विद्यापिठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌तर्फे 'दि फोस्ट हेअर्ड अँड दि ड्रीम सीर' या सामी भाषेतील नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. नॉर्वेच्या सामी नॅशनल थिएटरने हे नाटक सादर केलं. नाटकाच्या कलाकांना भारतीय प्रेक्षकांपर्यंत आपलं नाटक पोचवायचंय. 'दि फोस्ट हेअर्ड अँड दि ड्रीम सीर' हे लेखक निल्स असलॅक वाल्कीआप्पा यांनी त्यांच्या आयुष्यात लिहलेलं एकमेव नाटक. जगभरात फक्त 80,000 लोकसंख्या असलेल्या सामी जमातीची संस्कृती जपण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून बेईवास ही संस्था करतेय.मुंबईत झालेल्या दहशवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येताना तुम्हाला असुरक्षित वाटलं का ? हा प्रश्न आम्ही जेव्हा या नाटकातील कलाकारांना विचारला तेव्हा त्यांचं उत्तर होतं. नाही, आम्हाला हे शहर एकदम सुरक्षित वाटलं कारणअशी घटना घडल्यानंतर सुरक्षा मजबूत करण्यात येते. आणि म्हणूनच आम्ही इकडे येण्याचं ठरवलं.या नाटकाचे दिग्दर्शक सांगतात, या नाटकातून आम्ही भारतीयांना भेटतो. आता त्याच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक आहोत.