#तेलंगणा

Showing of 313 - 322 from 322 results
स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीला आंध्र प्रदेशात जोरदार विरोध

बातम्याDec 12, 2009

स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीला आंध्र प्रदेशात जोरदार विरोध

12 डिसेंबर आंध्रमधल्या तेलंगणा विरोधी आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे आणि राज्यभर हिंसा उसळल्यामुळे स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा थंड बस्त्यात टाकला जाण्यीच शक्यता आहे. आंध्रप्रदेशातल्या आमदारांचं एकमत झाल्याशिवाय स्वतंत्र तेलंगणाचा ठराव विधानसभेत मांडला जाणार नाही, असं मुख्यमंत्री रोसय्या यांनी स्पष्ट केलं आहे. तेलंगणाच्या विरोधात 100हून अधिक आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर रोसय्या यांनी हे निवेदन दिलं आहे. राजीनामा दिलेले सर्व आमदार आंध्र आणि रायलसीमा या भागातले आहेत. एकमत झाल्याशिवाय ठराव नाही, असं सरकारला सांगायला या आमदारांनी भाग पाडलं. तर प्रजाराज्यमचे अध्यक्ष चिरंजीवी यांनी स्वतंत्र तेलंगणासाठी योग्य प्रक्रियेचा अवलंब करायला हवा. स्वतंत्र तेलंगणाला आमचा पाठिंबा आहे. पण निर्णय घाईत घेणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. रायलसीमा आणि आंध्रच्या किनारी भागात तेलंगणाच्या मागणीविरोधात हिंसाचार सुरू आहे.