#तुळजाभवानी

VIDEO: पहिल्यांदा महिलेचा तुळजाभवानी देवीच्या चरणांना स्पर्श

बातम्याJan 6, 2019

VIDEO: पहिल्यांदा महिलेचा तुळजाभवानी देवीच्या चरणांना स्पर्श

उस्मानाबाद, 06 जानेवारी : उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाळीकर पुजारी महिलांनी आज देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जाऊन समस्त महिला दर्शन घेतातच. पण पाळीकर समाजाच्या महिलांना आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखीत अनुमती नव्हती. आज या पाळीकर पुजारी महिलांनी मंदिर गाभाऱ्यात जाऊन देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. भोपे पुजाऱ्यांच्या महिलांना चरणस्पर्श करण्याचा मान मिळावा हिच त्यांची मागणी होती पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं.

Live TV

News18 Lokmat
close