#तुर्की

VIDEO : रशियातील जहाज दुर्घटनेत कोल्हापूरच्या एकासह ६ भारतीय बेपत्ता

बातम्याJan 24, 2019

VIDEO : रशियातील जहाज दुर्घटनेत कोल्हापूरच्या एकासह ६ भारतीय बेपत्ता

मॉस्को, 24 जानेवारी : रशियाच्या समुद्र किनाऱ्यावर दोन जहाजांना आग लागली होती. या ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी रशियातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या जहाजांवर भारत, तुर्की, लिबीयाचे नागरीक असल्याचे समजते. एका जहाजावर गॅस आणि एकातून तेल वाहतूक केली जात होती. या दोन्ही जहाजावर मिळून 15 जण होते. एका जहाजावर स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. या जहाज दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावचा तरूण बेपत्ता झाला आहे. अक्षय जाधव असं कोल्हापूर मधील तरुणाचं नाव आहे. या दुर्घटनेत दोन्ही जहाजांवरचे 6 भारतीय बेपत्ता झालेत.