News18 Lokmat

#तुरुंग

Showing of 53 - 65 from 65 results
पुणे स्फोटातील आरोपीची येरवडा तुरुंगात हत्या

बातम्याJun 8, 2012

पुणे स्फोटातील आरोपीची येरवडा तुरुंगात हत्या

08 जूनजर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कतील जफर सिद्दीकीची येरवडा तुरुगात गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. काल रात्री अन्य कैद्यासोबत कतीलचं भांडण झाल होतं आणि आज सकाळी कतीलचा मृतदेह त्याचा सेलमध्ये आढळून आला. शरद मोहोळ आणि अलोक भालेराव या दोघांनी सिद्दीकीची पायजमाच्या नाड्यानं गळा दाबून हत्या केली.जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला बँगलोरहून एटीएसनं अटक करण्यात आली होती. एक महिन्यापुर्वीच कतीलला येरवडा कारागृहात हलवण्यात आलं होतं. दगडूशेट हलवाई मंदिराजवळ कतीलकडे बॉम्ब ठेवल्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र तिथली गर्दी पाहून कतील बॉम्ब न ठेवता पळून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र एटीएस त्याला बंगळुरूमधून ताब्यात घेतलं होतं. कतीलचा दिल्ली बॉम्बस्फोटातही हात असल्याचा एटीएसला संशय आहे. एक महिन्यापूर्वीच कतीलला येरवडा कारागृहात हलवण्यात आलं होतं. याप्रकरणी तुरुंग अधीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल असंही आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलंय.