#तालिबान

Showing of 40 - 48 from 48 results
जम्मू-काश्मिरमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं पुकारला बंद

बातम्याMay 8, 2009

जम्मू-काश्मिरमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं पुकारला बंद

8 मेजम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा एकदा बंद पुकारण्यात आला आहे. या वेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं तालिबान्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारलाय. सततच्या दहशतवादी हालचालींमुळे जम्मू-कश्मीरमध्ये अगोदरच निर्माण झालेल्या भितीच्या वातावरणात हा बंद पुकारल्यामुळे अधिकच भर पडली आहे. पाकिस्तानमध्ये तालिबान अल्पसंख्यांकांवर अत्याचार करत असल्याच्या विरोधात हा बंद पुकारल्याचं समजतंय. आंदोलकांनी जम्मू पठाणकोट हायवे ब्लॉक केला तसंच दुकानेही बंद करायला लावल्यामुळे पोलिसांना नाइलाजाने जमावावर लाठीचार्ज क रावा लागला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला या निदर्शनात बार असोसिएशन, ट्रेड असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, शीख असोसिएशन यांबरोबरच भाजप आणि स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचाही पाठिंबा आहे. शीख असोसीएशनने जम्मू-कश्मीरमधल्या युएनओच्या कार्यालयात जाऊन एक विनंतीपत्र दिलं आहे. युएनओने या प्रकरणात लक्ष घालावं आणि अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांपासून त्यांची सुटका करावी असं शीख नागरिकांचं म्हणणं आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांकडे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी लक्ष द्यावं आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी पाकिस्तानवर दबाव आणावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. त्यामुळे पाकिस्तानमधील तालिबानी अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आता एक राजकीय प्रश्न बनला आहे.