तरुणीचा विनयभंग Videos in Marathi

VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

महाराष्ट्रMar 19, 2019

VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे, 19 मार्च : भररस्त्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ही तरुणी पहाटे हॉटेलमधील पार्टीतून मित्राकडे जात असताना ही घटना घडली. पाठलाग करणाऱ्या दोघा तरुणांनी तिचा विनयभंग करून तिला मारहाण केली. यानंतर मदतीला आलेल्या तरुणीच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या मारहाणीचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालं आहे.