News18 Lokmat

#तणाव

Showing of 625 - 638 from 754 results
तलाठी,अधिकार्‍याच्या अंगावर वाळूमाफियाने घातला ट्रक

बातम्याMar 15, 2013

तलाठी,अधिकार्‍याच्या अंगावर वाळूमाफियाने घातला ट्रक

15 मार्चनाशिक : उत्तर महाराष्ट्रात वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरूच आहे, मुंबई आग्रा हायवेर मनमाड शहरात वाळूमाफियाने तलाठी आणि मंडल अधिकार्‍याच्या अंगावर ट्रक घातल्याने दोघंही जखमी झाले आहेत. या दोघांना शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याविरोधात नांदगाव आणि इगतपुरी तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. घोटी टोलनाक्यावर वाळूमाफियांनी महसूल पथकाला धमकावलं होतं. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये वाळूच्या अवैध व्यवसायातून जांबूत गावात एका ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. मुळा नदीपात्रातून वाळू घेऊन जात असताना काहीजणांनी रेवजी मेंगाळ याला मारहाण केली. ही मारहाण करणारे पोलीस आणि महसूल कर्मचारी असल्याचं स्थानिकांचं म्हणण आहे. मात्र महसूल विभागाची अशी कोणतीही रेड नसल्याचं प्रांताधिकार्‍यांनी स्पष्ट केलंय.जांबूत गावात ह्या सर्व प्रकरणावरुन मोठा तणाव आहे.