#ड्रोन

Showing of 1 - 14 from 71 results
Special Report : कोरेगाव-भिमावर 11 ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर

व्हिडिओDec 26, 2018

Special Report : कोरेगाव-भिमावर 11 ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर

पुणे, 26 डिसेंबर : दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथं होणाऱ्या 'विजय दिना'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या हिंसाचाराचे राज्यभर पडसाद उमटले होते. त्यामुळं यावेळी कुठलीही कसर बाकी न ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. कोरेगाव-भीमाच्या चारही बाजूंना 11 ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तसंच विजय स्तंभ असलेल्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळे आता 12 जानेवारीपर्यंत या परिसराचा ताबा राज्य सरकारकडे राहणार आहे. ऐतिहासिक विजय स्तंभाला 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत लाखो भीमसैनिक भेट देत असतात. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांची संख्या 15 पटीनं वाढवण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close