डॉ मनमोहन सिंग

Showing of 170 - 181 from 181 results
सिंग इज किंग

बातम्याMay 17, 2009

सिंग इज किंग

17 मेअखेर काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेचा कौल मिळाला. तर काँग्रेसच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिळालं आहे. जेव्हा काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग पत्रकारांना समोरे गेले. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी 'पुन्हा सेवेची संधी दिल्याबद्दल पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले. आभार मानताना तोच साधेपणा, तीच विनयशीलता आणि तोच धीरगंभीरपणा पहायला मिळाला. तेव्हा पाठिशी उभ्या असलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ' मनमोहन सिंगच पंतप्रधान होतील, अशी ठाम ग्वाही दिली.सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल दिलेली ग्वाहीच त्यांचं कर्तृत्व सांगून जाते. अणुकरारासारखा ऐतिहासिक करार करणार्‍या या कणखर पंतप्रधानावर विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणींनी निवडणुकीच्या तोंडावर 'दुबळा' पंतप्रधान म्हणून टीका केली. त्यावर 'कंधहार प्रकरणी हा लोहपुरुष का वितळला', असा भीमटोला मनमोहन सिंगानी दिला. त्यांच्या याच टोल्याने निवडणुकीत विरोधकांना वितळवून टाकलं आहे. गेले पाच वर्षं स्थिर सरकार दिलेल्या मनमोहनसिंगांनी अर्थमंत्री असताना देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं होतं. तेवढ्याच कठोरपणे मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. शेतकरी कर्जमाफीचा निर्णयही त्यांच्यातल्या कुशल अर्थतज्ज्ञाने घेतला. बहुदा त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1991नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने जागा मिळवल्यात. आता पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग एवढा काळ पद भूषवणारे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्याच पगडीत मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading