#डॉक्टर

Showing of 66 - 79 from 85 results
गणेश निधी : स्त्री भ्रूण हत्येविरोधात सावित्रींच्या लेकींचा लढा

बातम्याSep 29, 2012

गणेश निधी : स्त्री भ्रूण हत्येविरोधात सावित्रींच्या लेकींचा लढा

दीप्ती राऊत, जळगाव29 सप्टेंबरमहाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारं स्त्रीभ्रुणहत्येचं जळजळीत वास्तव बीडमधून पुढे आलं. पण त्याआधी गेल्या 5 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातल्या महिला या विरोधात लढत आहेत. त्यांना एकत्र आणणार्‍या जळगाव जिल्हा महिला असोसीएशनचा हा झगडा...जळगावच्या पद्मवती हॉस्पिटलच्या डॉ. राहुल कोल्हेंना बीडच्या डॉ. सुदाम मुंडे प्रकरणात अटक झाली. पण त्याआधी गेल्या 3 वर्षांपासून डॉ. कोल्हेंचं हॉस्पिटल जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या रडारवर होतं.अध्यक्षा वासंती दिघे म्हणतात, इतर डॉक्टर म्हणायचे जो मेन क्लप्रीट आहे डॉक्टर राहुल कोल्हे त्याचं काय. तेव्हा आम्ही खूप तयारी केली.लिंग तपासणीचं डॉक्टरांचं काम पकडून देण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्याचं ठरलं. पण त्यासाठी गरोदर महिला सापडेला. शेवटी संस्थेच्या कार्यकर्त्या मंगला नगरकरांचं कुटुंब पुढे आलं. इतर कार्यकर्त्यांनीही काटेकोर तयारी केली.स्त्रीभ्रुणहत्येबद्दल असोसिएशननं सुरुवातीला जनजागृतीपासून सुरुवात केली. पण जेव्हा मुलांच्या कमी प्रमाणात जळगावचा दुसरा क्रमांक लागला तेव्हा संस्थेनं कृतीवर भर दिला. आज जळगावमधल्या तब्बल 62 मंडळांच्या महिला असोसिशएनला जोडल्या गेल्यात. स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी जनजागृतीपासून स्ंटिगपर्यंत सगळ्या पातळ्यांवर झगडत आहेत.आपण या संस्थेला मदत करु शकतासंपर्कासाठी पत्ताजळगाव जिल्हा महिला असोसिएशन159, सोनारकर कॉम्प्लेक्सशनिपेठ, जळगाव - 4250019823376755

Live TV

News18 Lokmat
close