#डॉक्टर

Showing of 92 - 105 from 504 results
VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच!

व्हिडिओOct 8, 2018

VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच!

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पुणे, 08 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या कृपाली निकम या तरुणीचा पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंतगाचा मांजा खूप बारीक आणि धारदार असतो. त्यामुळे सहज शरीराला कापलं जाऊ शकतं आणि त्यातूनच या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. हा तोच मांजा आहे ज्याने कृपालीचं आयुष्य संपवलं. कृपाली पेशाने डॉक्टर होती पण तिच्या अशा जाण्यानं तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, हा मांजा अजूनही तिथेच पडला आहे. त्यामुळे आता अजून कोणाचा जीव जाण्याची पोलीस वाट बघतायत का असा प्रश्न आहे.

Live TV

News18 Lokmat
close