ठाणे

Showing of 2510 - 2523 from 2785 results
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसणार !

बातम्याOct 9, 2011

रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसणार !

09 ऑक्टोबरमुंबईसह, ठाणे आणि मुंबई उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिक्षांच्या वादाची अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. यासंदर्भात आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलावलेली बैठक पार पडली. इलेक्ट्रॉनिक मिटर लावलं पाहिजे ही शासनाची भूमिका संघटनांनी मान्य केली. मुंबईतील रिक्षांना आता इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार आहे. आणि वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता रिक्षाचे जवळपास 46 हजार मृत परवान्यांचे नुतनीकरण केलं जाणार आहे. रिक्षा संघटना आणि मुख्यमंत्री यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. तसेच भाडेवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आता एक समिती नेमण्यात येणार आहे. या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत बोगस परवान्यांना आळा घालण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे यापुढे रिक्षाचालकाचा परवाना मिळवण्यासाठी अटींची संख्या वाढवण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला 10 युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षाचालकाचा परवाना मिळवण्याच्या अटीही ठेवण्यात आल्या आहेत. वास्तव्याचा दाखल्याची अट किमान 15 वर्षाची ठेवण्यात येणार आहे. तसेच 3 वर्षाचा अनूभव आवश्यक राहणार आहे. 2007 ला नवीन ई मीटर्स लावायला बंदी घातली होती ती आता उठवण्यात आलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. भाडेवाढी संदर्भात समितीची स्थापना करण्यात येणार आहे. दहावी पास रिक्षाचालकाला पहिल्या टप्यात परवाना दिला जाईल तर दुसर्‍या टप्यात 8 वी पास असणार्‍यांना परवाने मिळतील. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला कामगार नेते शरद राव आणि मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख हेही उपस्थित होते. इल्काही महत्त्वाचे निर्णय 1. सर्व रिक्षांना टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार 2. सर्व नवीन रिक्षांना लगेचच इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार3. तसेच जुन्या रिक्षांना परवाना नुतनीकरणावेळी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार4. तर परवाना देताना 15 वर्ष वास्तव्याची अट कायम ठेवण्यात आली. 5. भाडेवाढीसंदर्भात समितीची स्थापना6. पहिल्या टप्प्यात दहावी पास असलेल्या व्यक्तींना परवान्यासाठी प्राधान्य7. दुसर्‍या टप्प्यात आठवी पास असलेल्या लोकांना प्राधान्य

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading