#ठाणे

Showing of 2159 - 2172 from 2198 results
मुंबईत उभी रहात आहेत स्वस्तातली घरं

बातम्याJan 28, 2009

मुंबईत उभी रहात आहेत स्वस्तातली घरं

28 जानेवारी, मुंबईमंदीचा सगळ्यात जास्त फटका बसला होता तो रिऍलिटी सेक्टरला. कर्ज महाग झाल्यानं लोकांनी घर खरेदी कमी केली होती. पण आता व्याजदरही कमी झालेत आणि महत्त्वाचं म्हणजे बिल्डर्सनीही आता लो कॉस्ट हाऊसिंग योजना आणायला सुरुवात केली आहे.मंदीचा फटका बसलेल्या हाऊसिंग सेक्टरला होमलोन स्वस्त झाल्यानं थोडा दिलासा मिळाला. पण तरीही लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना घरांच्या किंमती कमी करणं भाग होतं. म्हाडानं स्वस्त घरांच्या विक्रीसाठीचे अर्ज विकायला सुरुवात केली आणि त्यावर लोकांच्या उड्या पडल्या. घाटकोपर, चेंबूर, सायन, गोरेगाव, मालाड या भागात म्हाडाची ही 3863 घरं आहेत. लोकांनी दिलेल्या या प्रतिसादावरून लो कॉस्ट हाऊसिंग योजनांची गरज लक्षात येते.महागाई वाढली तेव्हा घरांच्या किंमती आणि कर्जाचे व्याजदर दोन्ही वाढले. अर्थातच घर विकत घेणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं. पण आता 20 लाखांपर्यंतची कर्ज बँकांकडून स्वस्त करण्यात आली आहेत. अनेक बिल्डर्सही लो कॉस्ट हाऊसिंग, नॅनो हाऊसिंगच्या योजना जाहीर करत आहेत.बिल्डर्सचं स्वस्त घरांना प्राधान्यजगभरात मंदीमुळे मोठमोठया कंपन्या आणि उद्योगधंदे चिंतेत आहेत. पण याच मंदीचा मुंबईमध्ये प्रायव्हेट बिल्डर्स आणि म्हाडाला मात्र या फायदा होतोय.मुंबईमध्ये सध्या लाट आलीये ती 1BHK आणि 1 1/2 BHKच्या घरांची. याचं कारण म्हणजे मंदी आणि लोकांचं कमी झालेेलं बजेटमुंबईतले 20-25 बिल्डर्स आता 1BHK घरांचे प्लॅन्स राबवत आहेत. "सुरुवातीला 50-60 टक्के लोकांचं 3-4लाख रुपये वार्षिक उत्पन्न होतं. तेव्हा एवढी गरज नव्हती पण आता लोकांची स्वस्त घरांची मागणी वाढली आहे" असं निर्माण ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी सांगितलं.1bhk घरांना मागणी असली तरी बिल्डर्संना मात्र यात काही विशेष नफा मिळत नाही. 1 BHK घरं बांधा किंवा स्टुडियो अपार्टमेन्ट्स बांधा. शेवटी FSI हा भरावाच लागतो असं बिल्डर्सचं म्हणणं आहे.पण काहीही असलं तरी मागणी तसा पुरवठा, या तत्त्वानुसार विल्डर्सना वागावं लागेल. बाजारातली बदलती समीकरणं पहात या बिल्डर्सनी योजना आणायला सुरुवात केलीय. कारण जास्त किंमती पाहून दूर राहिलेला ग्राहक पुन्हा आणण्यासाठी बजेट हाऊसिंग हा सध्यातरी एकच उपाय आहे.इथे उभी रहात आहेत स्वस्तातली घरंसर्वसामान्य लोकांना परवडतील अशी छोटी घरं बिल्डर्सनी बांधायला सुरुवात केलीय. पण यातली बरीचशी घरं उपनगरात उभी रहात आहेत. हे लो कॉस्ट हाऊसिंगचे प्रोजेक्ट्स कुठे कुठे सुरु आहेत, यावर एक नजर.सर्वसामान्य लोकांची हीच मानसिकता लक्षात घेऊन अनेक बिल्डर्सनी नॅनो हाऊसिंग ही संकल्पना मार्केटमध्ये आणली. पण मुळात ही घरं मुंबई आणि उपनगरांच्या बाहेर आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई विरार, वसई, कर्जत, नेरळ या भागांत बहुतेक प्रोजेक्टस आहेत ; कारण या भागातल्या जागेची किंमत. सर्वसाधारणपणे या भागात 322 स्वेअर फूट असणार्‍या वन रूम किचनची किंमत पाच ते सात लाखांपर्यंत आहे. तर साडे पाचशे स्वेअर फूटच्या वन बीएचकेची किंमत 10 ते 12 लाखांपर्यंत आहे. तर सातशे स्वेअर फूटच्या टू बीएचकेची किंमत 15 ते वीस लाखांपर्यंत आहे.वसई, विरार, डोंबिवली, नवी मुंबई या भागात घरं बांधायला बिल्डर्सला कमी खर्च येतो. पण या उपनगरातून लोकांना नोकरीसाठी मुंबईत जावं लागतं. तरीही इथल्या घरांना मध्यमवर्गियांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बिल्डर्सचं म्हणणं आहे. चांगलं घरं असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्या मुंबईत घर घेणं परवडण्यासारखं नाही. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये बसतील अशी घरं मुंबईबाहेर तयार होत आहेत. म्हणूनच, आपल्या स्वप्नातल्या घराची ही दूर जाणारी वाट मुंबईकरांना धरावी लागत आहे.