ठरवेल Videos in Marathi

VIDEO : मतदान केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

बातम्याMay 12, 2019

VIDEO : मतदान केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली, 12 : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांना या निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, 'किती जागा मिळणार, हे जनता ठरवेल. पण या निवडणुकीत मोदींनी द्वेषाचं राजकारण केलं तर आम्ही प्रेमाचं.' दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सात राज्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होणार असून त्यासाठी 979 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, दिल्लीतील 7 आणि झारखंडमधील 4 जागांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading