ट्रक Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 69 results
VIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात

व्हिडीओOct 13, 2018

VIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात

नाशिक, 13 ऑक्टोबर : नाशिकच्या तारवाला नगर सिग्नलवर काल मध्य रात्री 3:23 वाजता ट्रक व खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नसली तरी 5 ते 6 जण जखमी झाले आहेत. तेथील स्थानिक युवकांनी वेळीच मदत केल्याने मोठी हानी टळली आहे. या अपघाताची दृश्य cctv मध्ये कैद झाली आहेत. मृत्यूचा सापळा बनलेल्या या तारवाला नगरच्या सिग्नलवर झालेल्या या अपघातात 5 ते 6 जण जखमी झाले असून याठिकाणी अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याची खंत येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बडवे यांनी व्यक्त केलीय. अपघातग्रस्त बस गुजरात डेपोची असून, अंदाचे तीस प्रवासी या बस मधे प्रवास करत होते. सुदैवाने जीवित हानी नाही. पण काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याता आली असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत.