News18 Lokmat

#टोळी

Showing of 144 - 157 from 172 results
तरूणीच्या छेडछाडीचा जाब विचारणार्‍या तरूणाचा खून

बातम्याDec 5, 2012

तरूणीच्या छेडछाडीचा जाब विचारणार्‍या तरूणाचा खून

05 डिसेंबरछेडछाडीला विरोध करणार्‍या केनन आणि रुबेन यांची हत्या अजून लोक विसरलेले नसताना आता डोंबिवलीतही असाच प्रकार घडलाय. भर रस्त्यात तरुणीची छेड काढणार्‍या रोड रोमियोंना जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणाला आपला प्राण गमावावा लागलाय. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री ही घटना घडली. डोंबिवली पूर्व इथल्या नवनीतनगर सोसायटी इथे राहणारा संतोष विच्छिवोरा सोमवारी रात्री बसने घरी जात होता. त्यावेळी त्याच्या घराजवळ पाच जणांची टोळी एका मुलीची छेड काढत असल्याचं त्याला दिसलं. या मुलांना संतोषनं विरोध केला. तेव्हा त्या टोळीतल्या एका मुलानं संतोषवर हल्ला केला. आणि त्याला चाकूनं भोसकून ठार मारलं. या हल्ल्यात संतोषचा मृत्यू झाला. यावेळी संतोषला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या एका वृद्धालाही या मुलांनी जखमी केलं.