टेस्ट

Showing of 768 - 781 from 1164 results
लक्ष्मणचा क्रिकेटला अलविदा

बातम्याAug 18, 2012

लक्ष्मणचा क्रिकेटला अलविदा

18 ऑगस्टभारतीय टीमचा संकट मोचक व्हेरी व्हेरी स्पेशन अशा नावाने ओळखला जाणार व्ही व्ही एस लक्ष्मणने आज क्रिकेटला अलविदा केला आहे. येणार्‍या तरूण खेळाडूंना जागा मिळावी त्यांना संधी देण्याची ही योग्य वेळ आहे असं सांगत लक्ष्मणने आपण क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा हैदाराबादमध्ये केली. मला भारतीय टीमसोबत खेळायला मिळाले हे माझे भाग्य होते अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. येणार्‍या न्युझीलंडविरुध्द सुध्दा आपण खेळणार नसल्याचंही लक्ष्मणने स्पष्ट केलं. लक्ष्मणने 1996 मध्ये दक्षिण आफिकेविरूद्ध सामन्यात क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने एकूण 134 टेस्टमॅचमध्ये 8781 रन्स केले आहे. त्यात 17 सेंच्युरींचा आणि 56 हाफसेंच्युरींचा समावेश आहे. तसेच एकूण 86 व नडे मॅचेसमध्ये त्याने 2338 रन्स केले. यात 6 सेंच्युरींचा समावेश आहे. फॅब फोरमधल्या तिसर्‍या खेळाडूचा क्रिकेटला अलविदा केला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणची कारकीर्द1996 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणएकूण टेस्ट मॅचेस : 134 टेस्टमध्ये रन्स : 8,781टेस्टमध्ये सेंच्युरी : 17 टेस्टमध्ये हाफसेंच्युरी : 56 एकूण वन डे मॅचेस : 86वन डेमध्ये रन्स : 2,338वन डेमध्ये सेंच्युरी : 6 2001 : 281 धावांची सर्वोत्तम खेळी2012 : निवृत्तीची घोषणा

ताज्या बातम्या