News18 Lokmat

#टेस्ट

Showing of 456 - 469 from 786 results
'व्हाईट वॉश' धोणी ब्रिगेड

बातम्याAug 22, 2011

'व्हाईट वॉश' धोणी ब्रिगेड

22 ऑगस्टओव्हल टेस्टमध्ये इंग्लंडने भारताचा दणदणीत पराभव करत चौथी टेस्टही खिशात घातली. चार टेस्ट मॅचची सीरिज इंग्लंडने चार-शुन्य अशी जिंकली आहे. इंग्लंड दौर्‍यातील हा भारताचा गेल्या दहा वर्षातला हा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला. ओव्हल टेस्टमध्ये पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडने 6 विकेट गमावत 591 रन्स केले. पण हे आव्हान भारताला दोन वेळा बॅटिंग करुनही पार करता आलं नाही. राहुल द्रविडने केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर पहिल्या इनिंगमध्ये भारताने 300 रन्स केले. पण फॉलोअनची नामुष्की मात्र ते टाळू शकले नाहीत. दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय टीमला 283 रन्स करता आले. सचिन तेंडुलकर आणि अमित मिश्राने चौथ्या विकेटसाठी 144 रन्सची पार्टनरशिप करत इनिंगने पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. पण इतर बॅट्समन फ्लॉप ठरले. सचिन तेंडुलकरची विक्रमी सेंच्युरी केवळ 9 रन्सने हुकली. भारताने याआधीच टेस्ट क्रमवारीतील अव्वल स्थानही गमावले आहे.