#टॅक्स

Showing of 586 - 599 from 601 results
फॅमिली बजेट 2009 (भाग 2)

बातम्याJan 6, 2009

फॅमिली बजेट 2009 (भाग 2)

फॅमिली बजेट 2009 (भाग 2)नवीन वर्षात घरातील आर्थिक नियोजन कसं करावं. खर्च कशावर करायचे, घरातलं बजेट कसं असावं एकूणच आजच्या श्रीमंत व्हा कार्यक्रमात फायनान्सशियल प्लॅनिंग कसं करावं याविषयी जाणून घेतलं. आपलं नवीन वर्षाचं फॅमिली बजेट कसं असावं याविषयी मार्गदर्शन केलं फायनान्सशियल प्लॅनर चित्रा अय्यर आणि आशुतोष वाखरे यांनी.चित्रा सांगतात, प्रत्येकांने प्रथम आपण किती कमावतो, आपली बचत किती आहे, याकडे पाहूनच खर्च केला पाहिजे. प्रत्येक फॅमिलीने आपणं किती कमावतो, किती मिळकत करतो त्यानंतर आपण खर्च किती करतो त्यातून जी रक्कम शिल्लक राहते ती त्या फॅमिलीची बचत असते हे समजलं पाहिजे. आता ही शिल्लक राहिलेली बचत कशावर खर्च करायची, कोणत्या वस्तूवर खर्च करायची त्यांची त्या फॅमिलीने प्रथम एक लिस्ट तयार करायची. आता ह्या वर्षाला तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे. तर तुम्हाला त्यासाठी किती पैसे खर्च करायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. आजकाल लोक बचतीपेक्षा पैसे जास्त खर्च करताना दिसतात.त्यामुळे ते खर्च करून बसतात आणि त्यानंतर त्याच्याकडे मुख्य वस्तू जी घ्यायची असते त्यासाठी बाकी शिल्लकच राहत नाही. 2009 यावर्षी कशामध्ये गुंतवणूक करावी या सर्वांना अपेक्षित प्रश्नाला आपले दुसरे तज्ज्ञ आशुतोष वाखरे यांनी सांगितलं. समजा माझ्याकडे 100 रुपये असतील.तर त्यातील 10 रुपये मी आकस्मित खर्चासाठी बाजूला ठेवेन. 20 रुपये म्युच्युअल फंडाच्यामार्गाने शेअर विकत घेईन. 30 रुपये बॉन्ड फंडात जमा करेन.आणि 40 रुपये सोन्यामध्ये गुंतवेन असं त्यांनी सांगितलं. पण याचं पद्धतीने पैसे का गुंतवावे या प्रश्नांवर आशुतोष सांगतात, आकस्मित खर्चासाठी पैसा हवाच. म्युच्युअल फंडाच्यामार्गाने शेअर विकत घेतले तर इतर शेअरच्या तुलनेत रिस्क कमी असते.बॉन्ड फंडामध्ये व्याज दर कमी होतात. त्यावेळी बॉन्डवरील नफा फायद्याचा होता. आणि असं बोललं जातं की येणा-या काळात डॉलर खाली येईल आणि सोन्याची किंमत वाढेल म्हणून मी माझे पैसे अशा त-हेने गुंतवेन. सोन्यामध्येही आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे गोल्ड एक्सचेंज क्रेडिट फंडमध्ये केलेली गुंतवणूक अधिक फायद्याची आहे.ह्या फंडामध्ये आपण कितीही कमी किंवा जास्त पैसे टाकू शकतो.तसेच ह्या गोल्ड एक्सचेंज क्रेडिट फंडमध्ये कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. कारण दागिन्यांच्या स्वरुपात आपण सोनं खरेदी केलं तर टॅक्स भरावा लागतो. म्हणून गोल्ड फंडाच्या स्वरूपातली गुंतवणूक नक्कीच फायद्याची ठरते. फक्त या फंडातली गुंतवणूक कशात होणार आहे यांची काळजी घेतली तर हा फंड नक्कीच फायदेशीर आहे. आशुतोष सांगतात,सद्याची शेअर बाजारातील स्थिती पाहता ज्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी काही थोडीफार म्हणजे रु.40ते50,000/- इतकीच रक्कम असेल अशांनी शेअर बाजाराची रिस्क घेऊ नये. त्यांनी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतववावेत.सद्याची परिस्थिती पाहता सर्वत्र मंदीच वातावरण आहे. अशावेळी शेअर बाजारात पैसे टाकले पाहिजेत. पण रिटर्नसाठीचा अवधी पाच ते दहा वर्षाचा ठेवला पाहिजे. म्हणजे लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. समजा तेलाचे भाव कमी झाले तर तेल कंपन्यांना फायदा होईल. तसंच व्याजदर कमी झाले तर हाऊसिंग कंपनी, ऑटोमोबाइल क्षेत्राला फायदा होईल.शेवटी प्रत्येकाने टॅक्सच्या दृष्टीकोनातून बचत न करता. वर्षाच्या सुरुवातीपासून बचत केली पाहिजे जेणेकरून ती वर्षाच्या शेवटी फायदेशीर होईल.