स्वाती घोसाळकर, मुंबई29 जूनआशिया कप स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यावर आता श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. पण टेस्ट मॅच ही पूर्णत: वेगळी आहे आणि हे टीम इंडियालाही चांगलेच माहित आहे. त्यामुळे बॅटींग आणि बॉलिंग या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा टीमचा प्रयत्न असेल.आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेविरूद्ध जबरदस्त कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले. गेल्या दोन आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेचे वर्चस्व होते. पण धोणीच्या टीम इंडियाने हे वर्चस्व मोडून काढले.आता टीम इंडिया सज्ज झाली आहे, ती श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी. 2008 मध्ये श्रीलंकेने टेस्ट सीरिज 2-1ने जिंकली होती. त्यावेळी अजंता मेंडिसच्या बॉलिंगसमोर भारताचे बॅट्समन हताश झाले होते. पण यावेळी मात्र बॅट्समन चांगली कामगिरी करेल, असा विश्वास क्रिकेटर राहुल द्रविडने व्यक्त केला आहे. द्रविड जवळ जवळ सहा महिन्यांच्या गॅपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.भारतीय निवड समितीने बॉलिंगमध्ये झहीर खानबरोबर ईशांत शर्मा आणि श्रीसंतला पसंती दिली आहे. भारताचा बॉलिंग अटॅक कागदावर जरी जबरदस्त असला, तरी दुखापतीतून आणि बॅड पॅचचा पगडा घेऊन बॉलर्स श्रीलंकेला जाणार आहेत. त्यामुळे श्रीलंका याचा फायदा नक्की घेईल. पण भारताने सांघिक खेळ केला तर टीम चांगली कामगिरी करेल, असे स्पष्ट मत भारताचा फास्ट बॉलर झहीर खानने मांडले आहे.एकंदरीतच आशिया कपमध्ये भारतीय टीम श्रीलंकापेक्षा वरचढ ठरली होती. पण आता टेस्ट सीरिजमध्ये अनुभवाच्या जोरावर टीम 2008च्या पराभवाचा वचपा काढेल का हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.