#टीम इंडिया

Showing of 287 - 300 from 323 results
टीम इंडियात फूट; धोणी-सेहवागमध्ये वाद ?

बातम्याJan 10, 2012

टीम इंडियात फूट; धोणी-सेहवागमध्ये वाद ?

10 जानेवारीऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय टीमची कामगिरी खराब होतेय. मैदानावर पार्टनरशिप होत नाही आणि त्यातच तिसर्‍या टेस्टपूर्वी टीममध्ये फूट पडल्याच्या बातम्या मीडियात पसरल्या आहेत. सिडनी टेस्ट चौथ्या दिवशीच संपल्यामुळे टीम इंडिया एक दिवस आधीच पर्थला पोहोचली. आणि मिळालेला हा जादा दिवस टीममधल्या काही खेळाडूंना गो कार्टिंगमध्ये घालवायचा होता. तर सेहवाग, द्रविड आणि लक्ष्मण यांना गो कार्टिंग ऐवजी सरावावर लक्ष केंद्रीत करावं असं वाटत होतं. आणि या मुद्दयावरुनच सेहवाग आणि कॅप्टन धोणी यांच्यात त्या दिवशी चांगलीच जुंपली. धोणीबरोबरच सचिन तेंडुलकर, ईशांत शर्मा, विराट कोहली या खेळाडूंनी गो कार्टिंगची मजा लुटली. हा वेळ प्रॅक्टिसमध्ये घालवावा असं सेहवागचं म्हणणं होतं. कोच फ्लेचर यांनी मात्र टीममध्ये दुफळी माजल्याची बातमी साफ धुडकावून लावलीय. गो-कर्टिंग म्हणजे खेळाडूंसाठी एकत्र येण्याची एक संधी होती असं फ्लेचर यांचं म्हणणं आहे.