टँकर

Showing of 287 - 300 from 308 results
कारवाईचा फास आवळला

बातम्याJan 28, 2011

कारवाईचा फास आवळला

28 जानेवारीराज्यात आजही धाडसत्र कायम आहे. धाडीमध्ये पोलिसांनी माफियांचं रॅकेट उधळून लावलं. तेल, दूध, वाळू या सर्व प्रकारच्या माफियांवर राज्य सरकारने आक्रमकपणे धाडसत्र सुरु केलं.आज अहमदनगर, बार्शी, अकोला, रत्नागिरी, सांगली याठिकाणीही मोठे छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत अंदाजे 200 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी धाड आहे ती मुंबईतली मुंबईमध्ये नकली तेल बनवणार्‍या 7 अड्‌ड्यांवर धाडी टाकण्यात आल्यायत. मुंबई पोलिस स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली. या गोडावूनमधून एक हजार ड्रम्स जप्त करण्यात आले. या ड्रम्समध्ये 2 लाख लीटर बनावट तेल होतं. मुंबईतला नकली तेलाचा माफिया गफार यालाही अटक केली. सर्व गोडावून सील करण्यात आली. तर कोल्हापूर- मलकापूर इथं डिझेलच्या भेसळखोरावंर पोलिसांनी छापा टाकला. 1 लाख 10 हजार रुपये किमतीचं भेसळयुक्त डिझेल जप्त केलं. पाडूरंग शिंदे या माफियाला इथं अटक झाली. तर सांगलीमध्ये भेसळयुक्त पेट्रोल डिझेल विकणारे तीन पेट्रोल पंप सील केले. वाशिममध्ये रॉकेल-डिझेलचा काळा बाजार करणारा टँकर जप्त झाला. साडेसात लाख किंमतींचा माल इथं जप्त झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहरात बनावट ऑईल तयार करण्याचा धंदा सुरु होता. इथल्या छाप्यात दहा लाख रुपयांचं साहित्य जप्त झालं. टोळीचा म्होरक्या चैतन्य कुलकर्णीचा शोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या बाभूळगाव इथल्या धाब्यावर टाकलेल्या छाप्यात निळ्या रॉकेलची बेकायदेशीर विक्री करताना तीन जणांना रंगेहात पकडण्यात आलं. तसेच 25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी भेसळयुक्त तेल ट्रक चालकांना इंधन म्हणून विकण्यात येत होतं. रत्नागिरीमध्येही भेसळ माफियांविरुद्द धडक कारवाई करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading