जोडीदार Videos in Marathi

मनिषाच्या मारेकर्‍यांना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

बातम्याApr 9, 2012

मनिषाच्या मारेकर्‍यांना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

09 एप्रिलपुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रातील आणखी एक मुलगी खोट्या प्रतिष्ठेची बळी ठरली. जळगाव जिल्ह्यातल्या पाथरी गावात परजातीतल्या मुलावर प्रेम करणार्‍या मुलीचा तिच्या कुटुंबीयांनीच खून केला. यात तिघांना अटक झाली. समाजात अजूनही जातीपातीचा किती वाईट पगडा आहे, हे या घटनेनं पुन्हा दिसून आलंय. माणुसकीला काळीमा फासणा-या या घटनेतल्या दोघा आरोपींना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर आजीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.खोट्या प्रतिष्ठेसाठी पुन्हा एकदा मुलीची हत्या..सातारा जिल्ह्यातीलं प्रकरण ताजं असतानाच जळगाव जिल्ह्यातल्या पाथरी गावात अशीच घटना घडली. पाथरीतल्या मनिषा धनगरने तिचा जोडीदार निवडला होता. पण तिचं हे प्रेम मान्य नसल्याने, तिच्या कुटुंबीयांनीच तिची हत्या केली. त्याला कारण एकच...समाजातली खोटी प्रतिष्ठा...याप्रकरणावर गावातली एकही व्यक्ती स्पष्टपणे बोलायला तयार नाही.मनिषाच्या हत्येला केवळ तिचे कुटुंबीयच जबाबदार नाहीत तर त्याला तिचा प्रियकरही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप मनिषाच्या आईनं केला. पण संदीपने मात्र मनिषा बरोबरच्या प्रेमाची कबुली देत हा आरोप फेटाळला आहे.ज्या घरात मनिषा लहानाची मोठी झाली, घरातल्या सर्वच लहानथोरांच्या अंगाखांद्यावर खेळून ती मोठी झाली. पण त्याच घराने आज मनिषाला होत्याचं नव्हतं केलं.समाजावर जातीपातीचा पगडा किती घट्ट आहे, हे मनिषाच्या हत्येमुळे समोर आलंय. मुलीच्या मनातलं प्रेम समजून घेण्याऐवजी तिच्यावर केवळ खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपायी खुद्द मुलीच्या बापाकडूनच तिचा गळा घोटला जातोय. पुरोगामी महाराष्ट्राचा बदलणारा हा चेहरा मोठा धक्कादायक आहे.पुरोगामी महाराष्ट्राचा ठेंबा मिरवणारे आपण सारे आजही जुन्या रुढी आणि परंपरांच्या विळख्यात इतके घट्ट अडकलो आहोत, हेच या घटनेवरुन सिद्ध होतं. पाथरीतली दुदैर्वी घटनेचा घटनाक्रमअतिशय निर्दयीपणे हा खून करण्यात आला. मनिषा झोपेत असताना पहाटे तिचे वडील, काका आणि आजीनं तिचा गळा आवळून तिचा खून केला. वडील आणि काकांनी तिचे हातपाय धरले आणि आजीने गळा दाबला. मनिषा मेल्याची खात्री पटल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळच्या रेल्वे रुळावर टाकला. रेल्वेखाली आल्याने तिचा चेहरा ओळखण्यापलिकडे गेला. आणि इकडे तिचे कुटुंबीय अतिशय शांत होते. कुणी मनिषाबद्दल विचारलच तर ती नातेवाईकांकडे गेल्याचं सांगितलं जायचं. पण अखेर हा सर्व प्रकरणाचा छडा लागलाच... - 12 मार्चला मनिषाचा प्रियकर संदीपला मनिषाच्या आजीने मारहाण केली- 12 मार्चला मध्यरात्री मनिषाला आजी सोनाबाई, वडील युवराज, काका शरदनं गळा दाबून तिची हत्या केली - 13 मार्चला पहाटे मनिषाचा मृतदेह पोत्यात भरुन मोटरसायकल पाचोरा शिवारातल्या रेल्वे ट्रॅकवर टाकला- 13 मार्चला पाचोरा रेल्वे पोलिसांना मनिषाचा मृतदेह सापडला, त्यांनी त्याची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली- 14 मार्चला मनिषाचा मृतदेह बेवारस म्हणून नगरपालिकेनं पाचोरा शिवारात पुरला- 4 एप्रिल जळगावच्या एमआयडीसी (MIDC) पोलीस स्टेशनला निनावी पत्र मिळाले, पत्रात मनिषाची हत्या तिच्या वडिलांनी केल्याची माहिती - 5 एप्रिल अप्पर पोलीस अधीक्षक ईशु सिंधु यांनी तपासासाठी 2 स्वतंत्र पथक तयार केली - 7 एप्रिल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना यश, मध्यरात्री मनिषाचे वडील युवराज धनगर, काका शरद ऊर्फ बापू यांना अटक - 8 एप्रिल तपासात आजी सोनाबाई यांचा सहभाग, पहाटे सोनाबाईला अटक- 8 एप्रिल जळगाव न्यायालयाने वडील युवराज, काका शरद यांना 12 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी, आजी सोनाबाईला 14 दिवस न्यायालयीन कोठडी - 9 एप्रिल- मृत मनिषाच्या मृतदेहाची पाहणी करण्यासाठी पोलीस पथक पाचो-यात पोहोचलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading