जैन Videos in Marathi

Showing of 40 - 42 from 42 results
वैयक्तिक व्देषातून अण्णा विरुध्द पवार ?

बातम्याDec 8, 2011

वैयक्तिक व्देषातून अण्णा विरुध्द पवार ?

आशिष जाधव, मुंबई08 डिसेंबरराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण हा एकमेकांमधला द्वेष जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावरुन नाही तर, दोन दशकातल्या व्यक्तिगत सुडामधून समोर आला आहे. अण्णा विरुद्ध पवार ही लढाई महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालली आहे. अण्णा विरुद्ध पवार हा वाद महाराष्ट्रासाठी काही नवा नाही, यावादाची पहिली ठिणगी साधारण वीस वर्षांपूर्वी पडली. पवार मुख्यमंत्री असताना अण्णांनी सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडलं होतं. त्यासाठी राळेगणला उपोषणही केलं होतं. त्यानंतर सोलापूर कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन अण्णा आळंदीला उपोषणाला बसले होते. याही वेळी अण्णांनी पवारांवर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. अशातच पवारांच्या विरोधात राज्यभर रान उठवणार्‍या गो रा खैरनारांना अण्णांनी पाठिंबा दिला. एवढंच नाही तर त्यांनी खैरनारांना राळेगणला नेलं. अशातच काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीचं सरकार आलं. शरद पवार अण्णांमध्ये जगजाहीर भांडणं झाली ती 2003 मध्ये...अण्णांनी केलेल्या आरोपांवरुन सुरेश जैन, विजयकुमार गावित आणि नवाब मलिक या पवारांच्या तीन शिलेदारांना आपली मंत्रीपदं गमवावी लागली. पण सुरेशदादा जैन यांनीसुद्धा अण्णांवर आरोप करुन अण्णांनाही हैराण केलं. अण्णांच्या उपोषणाला सुरेशदादा जैन यांनी त्यांच्यासमोरच उपोषणाला बसले. तेव्हा शरद पवारांनी मोठी खेळी खेळली. न्यायमूर्ती पी बी सावंतांचा आयोग नेमला गेला. त्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबरच अण्णांच्या हिंद स्वराज्य ट्रस्टचीही चौकशी झाली. त्यामध्ये अण्णांच्या ट्रस्टवर प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला. पुढे पवारांचेच एक शिलेदार पद्मसिंह पाटील यांच्यावर तेरणा साखर कारखाना आणि उस्मानाबाद जिल्हा बँकेतल्या भ्रष्टाचाराचे आरोप अण्णांनी केले. याचवेळी पद्मसिंह पाटील आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोपसुद्धा अण्णांनी केला होता. अण्णांचा पवार द्वेष वाढवण्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बरीच उठबस केल्याचं आजही बोललं जातं. विलासरावमुळेच अण्णा मंत्र्यांची शाळा घेऊ लागले. अण्णांचं प्रस्त वाढलं होतं. जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावर अण्णा दिल्लीपर्यंत पोहचले. अशातच लोकपाल बिलाच्या मसुदा समितीत शरद पवारांसारख्या भ्रष्टाचारी नेत्याचं काम काय असा प्रखर हल्ला अण्णांनी चढवला. त्यामुळे पवारांनी समितीचा राजीनामा देऊन बाजूला होणं पसंत केलं. सध्या अण्णा आणि पवारांमध्ये जे होतंय याचा इतिहास ताजा आहे.