#जैन

Showing of 417 - 430 from 450 results
धारवाडमध्ये आढळल्या शेकडो मानवी कवट्या

बातम्याSep 1, 2010

धारवाडमध्ये आढळल्या शेकडो मानवी कवट्या

1 सप्टेंबरकर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात शेकडो मानवी कवट्या आढळल्या आहेत. नवलगुंद तालुक्यातील अन्निगिरी नाल्यात खोदकाम करताना या कवट्या मिळाल्या आहेत. संततधार पावसामुळे नाल्यात पाणी भरल्याने जेसीबी मिशिनच्या साह्याने नाल्यात काम करण्यात येत होते. त्यावेळी या कवट्या मिळाल्या. जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने परिसर सील करून तज्ज्ञांना पाचारण केले. या भागात टिपू सुलतान, हैदर अली यांच्या काळात अनेक लढाया झाल्याचा उल्लेख आहे. युध्द काळात मृत्यूमुखी पडलेल्यांना किंवा साथीच्या रोगात मृत्यूमुखी पडलेल्यांना एकाच ठिकाणी गाडण्यात आले असेल, असा अंदाज काही इतिहासतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र या प्रकरणाचे गूढ कायम आहे. या कवट्यांचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती धारवाडचे कलेक्टर दर्पण जैन यांनी दिली आहे. कर्नाटक विद्यापाठाच्या पुरातत्व विभागाचे संशोधकही याचा शोध घेत आहेत.