04 ऑगस्ट : स्वत:ला फिट आणि आरोगी ठेवण्यासाठी अनेक जण जिम किंवा योगा करण्यासाठी जातात तर काही लोक घरीच व्यायाम करतात. पण योगा, आणि व्यायाम करण्याच्याही काही योग्य पद्धती आहे. त्यासाठी गरज असते ती एखाद्या ट्रेनरची. पण आता त्यासाठी तुम्हाला काही कष्ट घेण्याची गरज नाही आहे. कारण तुमच्या आरोग्याची काळजी घेत आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अशा काही टिप्स ज्याने तुम्हाला ट्रेनरशिवाय योग्य पद्धतीने व्यायाम करू शकता. योग्य पद्धतीने आपल्या शरीराच्या मर्यादेनुसार व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. चुकीचा व्यायाम केल्याने त्याचा धोका आपल्या जीवालाही होऊ शकतो. त्यामुळे डंबेल्स घेऊन व्यायाम करताना काळजी घ्या.