#जितेंद्र आव्हाड

Showing of 378 - 389 from 389 results
काँग्रेस-राष्ट्रवादीची जुंपली

बातम्याJun 29, 2010

काँग्रेस-राष्ट्रवादीची जुंपली

29 जूनगेली काही वर्षे नाईलाजाने का होईना राज्यात सत्तेचा संसार करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घरातून आता आरोप-प्रत्यारोपांचा खणखणाट ऐकू येऊ लागला आहे. राष्ट्रवादीला विशिष्ट विचार राहिलेला नसून चार दोन जागा निवडून येण्यासाठी किंवा काँग्रेसच्या जागा पाडण्यासाठी सांगलीसारख्या ठिकाणी दंगल भडकवावी लागते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी केला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही दलवाईंच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दलवाई हे काँग्रेसचे देशपातळीवरचे एकमेव धर्मनिरपेक्ष प्रवक्ते आहेत, असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दलवाईंना मारला आहे. तसेच हुसेन दलवाई यांचाही इतिहास तपासण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. तर दलवाईंनी सांगली दंगलीबाबत केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते गुरुनाथ कुलकर्णी यांनी म्हटले आहे. तसेच सत्तेत एकत्र असताना तरी सांभाळून बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दलवाईंना दिला आहे. विशेष म्हणजे कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रत्नाकर महाजन यांनी केली होती. त्यावर असा सल्ला देणारे रत्नाकर महाजन कोण? असा सवाल राष्ट्रवादीतून विचारला जात आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व हे स्वतंत्रच राहील, असे गुरुनाथ कुलकर्णी यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सेना-भाजप युती परस्पर द्वेषाच्या तापाने फणफणत आहे. आता सत्ताधारी आघाडीच्या अंगातही हा ताप चढू लागल्याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.