#जिंकली

Showing of 53 - 66 from 333 results
VIDEO VIRAL : क्रिकेटच्या मैदानात विदर्भाचे खेळाडू म्हणतात,'How's the Josh?'

बातम्याFeb 7, 2019

VIDEO VIRAL : क्रिकेटच्या मैदानात विदर्भाचे खेळाडू म्हणतात,'How's the Josh?'

नागपूर, 7 फेब्रुवारी : विदर्भाने सौराष्ट्रला हरवून दुसऱ्यांदा रणजीचे विजेतेपद पटकावले. पहिल्यावर्षी जिंकल्यानंतर यंदा तीच कामगिरी कायम ठेवण्याचं दडपण विदर्भावर होतं. तरीही संघाने सलग दुसरं विजेतेपद पटकावून पहिल्यांदा केवळ नशिबाने जिंकलो नव्हतो हे सिद्ध केलं. विजयानंतर करंडक उंचावून संघाने जोरदार जल्लोष केला. यावेळी खेळाडूंनी हाउज द जोश? म्हणत विजयाचा आनंद साजरा केला. विदर्भाने पहिल्या डावात 5 धावांची आघाडी घेतल्यानंतर 206 धावांचे आव्हान सौराष्ट्रला दिले. त्यानंतर 127 धावांत सौराष्ट्रच्या संघाला गुंडाळून 78 धावांनी विजय मिळवला. फैज फजलच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी विदर्भाने केली आहे. अशी कामगिरी करणारा तो 11 वा कर्णधार ठरला आहे. रणजी ट्रॉफी सलग तीनवेळा जिंकण्याचा विक्रम मुंबईचे कर्णधार बापू नाडकर्णींच्या नावावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने 1964 ते 66 अशी सलग तीन वर्ष रणजी ट्रॉफी जिंकली होती.

Live TV

News18 Lokmat
close