17 एप्रिल दिनेश केळूसकर, रत्नागिरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कुडाळमध्ये आज अटक करण्यात आली होती. पण आता त्यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत यांच्यावर कुडाळमधल्या शिवसेना- भाजपच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात होता. ही सभा 25 मार्चला झाली होती. संजय राऊत यांची उद्या कुडाळमध्ये सभा आहे. त्यासाठी ते कुडाळमध्ये आले होते. ते स्वत: कोर्टात हजर झाले. त्यांच्याविरुदद्ध सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत कुडाळकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.कुडाळ इथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातकेलेल्या प्रक्षोभक भाषणामुळं सजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. या सभेत त्यांनी पोलिसांनाही दम दिला होता. राजकीय दबावाखाली शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत कुडाळकर यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय.